Home Breaking News शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे राष्टÑवादीत

शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे राष्टÑवादीत

0
शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे राष्टÑवादीत

विदर्भ वतन,नागपूर-विदर्भात शिवसेनेला गेल्या काही दिवसातील दुसरा एक मोठा धक्का बसला आहे. गत काही दिवसांपूर्वी वध्यार्तील शिवसेनेच्या माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी नागपुरातील शिवसेनेचे नेते व विदभार्तील शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर सावरबांधे यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते राकाँत प्रवेश केला. पुढे होऊ घातलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नंदनवन स्थित सावरबांधे यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल, राकाँ निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, दिलीप पनकुले आदी उपस्थित होते. त्यापूर्वी सावरबांधे यांनी सकाळी मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा पाठविला. याबाबत शेखर सावरबांधे म्हणाले की, माज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे हा काळ पक्षवाढीचा असतो, अशी अपेक्षा असते. परंतु गेल्या काही दिवसांत नवनवीन लोकांना पक्षात आणताना ज्यांनी याआधी कुठेही चांगले काम केले नाही अशांना पक्षात समाविष्ट करण्यात आले. आमच्या सहसंपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनाही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नसावे असे त्यांच्या अभिभार्वावरून लक्षात येते. मग त्यांच्यासारख्या नेत्यांना डावलले जात असेल तर आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही. बाहेरून आलेल्या लोकांना पदे वाटप केली जात असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो. नुसते पद घेऊन घरी बसणे अशी यंत्रणा पक्षात सुरू आहे. त्यामुळे हे पक्षासाठी चांगले नाही. त्यामुळे मी पक्षातून बाजूला होण्याचे ठरवले. याबाबत मी पक्षप्रमुखांना ई-मेल करून कळविले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझी कुणाबद्दल तक्रार नाही. माज्यासोबत कोणी पक्ष सोडावा असा कोणताही आग्रह कुणाला केला नाही, असेही शेखर सावरबांधे यांनी स्पष्ट केले आहे. सावरबांधे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ होते. त्यांनी महापालिकेत उपमहापौर म्हणूनही काम सांभाळले आहे.