Home Breaking News प्लॉट हडपायचा होता म्हणून भंतेने केला महिलेचा खून

प्लॉट हडपायचा होता म्हणून भंतेने केला महिलेचा खून

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12656*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

44 views
0

विदर्भ वतन, खापरखेडा-खापरखेडा पोलिस ठाण्यांतर्गत पिपळा डाकबंगला येथे शिवली बोधी भिख्खू निवास येथे एका पुरुष भंतेने महिला भंतेची हत्या केल्याची घटना रविवारी (२९ आॅगस्ट) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सामनेरी बुद्ध प्रिया ऊर्फ कुसूम सुनील चव्हाण (वय ४५), रा. इंदिरानगर, पेट्रोल पंपजवळ, जरीपटका पोलिस स्टेशनसमोर नागपूर असे मृत महिला भंतेचे नाव आहे. तर भदंत धम्मानंद थेरो ऊर्फ रामदास झिनुजी मेर्शाम (वय ५८) रा. पिंपळा डाकबंगला, मूळ गाव यशोधरानगर, संजय गांधीनगर वॉर्ड नंबर २, फेजपूर, अमरावती असे आरोपीचे नाव आहे.
सदर घटनेतील आरोपीने मृतक महिलेला भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर सपासप तीन वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. इतकेच नव्हे तर तोंडावर हातोडा मारून हत्या केली. शिवली बोधी भिख्खूू निवासाचे २0१७ पासून पिपळा डाकबंगला येथे लोकवर्गणीच्या माध्यमातून काम सुरू आहे. शिवाय भिख्खू निवासाच्या बाजूलाच मृत कुसूम चव्हाण यांचा प्लॉट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपी तो प्लॉट हडप करण्याच्या बेतात होता. यावरून मृतक व आरोपींमध्ये नेहमीच खटके उडायचे. मृतक महिलाही नेहमी नागपूरवरून अधूनमधून ये-जा करीत होती. मृत महिलेने आरोपीची बदनामी केल्यामुळे तो त्रस्त झाला होता. तिच्या वारंवारच्या त्रासापासून मुक्त होण्याकरिता रविवारी खून करण्याची योजना आखली. खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच खापरखेडा पोलिस उमेश ठाकरे, नूमान शेख यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनेचा पंचनामा करून प्रेत शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता हलविण्यात आले. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३0२ चा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.