Home Breaking News १३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…

१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…

0
१३ वर्षाची मुलगी बॉयफ्रेन्डला भेटायला गेली अन्…

विदर्भ वतन,वृत्तसंस्था-रांची : झारखंडची राजधानी रांचीच्या मंदारमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. पण तिथे तिच्या मित्र आणि इतर सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. आणखी तीन जण फरार आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सामूहिक बलात्कार करणारे सातही जण हे अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे.
अल्पवयीन मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. हे प्रकरण गुरुवारचे असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा ७ मुलांनी १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीने शुक्रवारी मंदार पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई केली. यात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. फिरण्याच्या बहाण्याने फसवून नेले एका ओळखीच्या मुलाने आपल्याला एका ठिकाणी बोलावले. तिथे गेल्यावर आपल्याला फिरण्याच्या बहाण्याने त्याने बाइकवर बसवले आणि निर्मनुष्य ठिकाणी नेले. तिथे आधीच त्याचे ६ मित्र आलेले होते. यानंतर ७ ही जणांनी एक-एक करून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.
पोलिसात केलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे. सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला तिच्या मैत्रीणीच्या घराजवळ सोडले घटनेनंतर आरोपीने पीडितेला तिच्या मैत्रीणीच्या घरीजवळ सोडले. पीडितेने तिथेच रात्र काढली. यानंतर सकाळी आपल्या घरी पोहोचल्यावर कुटुंबीयाना सर्व घटना सांगितली. हे कळताच कुटुंबीय तिला घेऊन पोलिसात गेले आणि तक्रार दाखल केली.