नाल्यात पोहणे जीवावर बेतले…

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12645*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

122

विदर्भ वतन,दारव्हा (यवतमाळ)-येथील उत्तरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या नाल्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. गोपाल रमेश आसोले (१२) व रोहित गौतम हटकर (१३) दोघेही राहणार श्रीकृष्णनगर, असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहराच्या श्रीकृष्णनगर परिसरातील रहिवासी दोन सख्या भावासह एकूण चार मुले शहरापासून जवळपास २ किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर रविवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. चौघांनी नाल्यातील डोहात उड्या मारल्या. परंतु, डोहात गाळ व पाणी जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हते. मुले जीवाच्या आकांताने तडफडत असताना नाल्याच्या काही अंतरावर शेतात काम करीत असलेल्या प्रतीक फेंडर याच्या लक्षात ही बाब आली. त्याने नाल्याकडे धाव घेतली. पाण्यात उडी मारून गुलशन रमेश आसोले व वेदांत अमोल पंचबुद्धे या दोघांना वाचवण्यात त्याला यश आले. ही वार्ता माहीत होताच सर्पमित्र विनोद वांड्रसवार, चेतन कुकडे, रोहित ढोरे, ऋषिकेश कांबळे, शुभन कटनकर, शिवम दुधे, गोलू भडके आदींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाळात फसलेल्या मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.