अनाथ मुलांचा अन्नदाता बनला मंगेश झाडे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12626*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

283

विदर्भ वतन,नागपूर-आदर्श समितीच्या वतीने मंगेश झाडे यांनी कोरोना काळामध्ये आदर्श समितीचे अध्यक्ष गुरुदास बावणे यांच्या सहकार्याने गरीब व अनाथ मुलांना रस्त्यावर शोधून शोधून अन्न वाटप करण्यात आले. खूप काही गरिब लोकांना, अनाथांना किट्स व अन्न वाटप केले. बिकटकाळ निघून गेला तरीही कोरोना योध्दा म्हणून ते आजही लोकांना मदत करीत आहे. मागच्या ६ दिवसापासून त्यांनी रोज 50 ते 60 गरीब व अनाथ मुलांना अन्न वाटप करत आहेत. हे खूप मोठं मोलाचे काम या आदर्श समितीने केले आहे. कोरोना काळात गरीब लोकांची खूप बिकट परिस्थिती होती व आजही आहे. ते उपाशी राहू नये या करिता ही आदर्श समिती आपलं रोजचं अन्न वाटप करत आहे.

विशेषत: रस्त्यावरील अनाथ मुलं रोज आतुरतेने वाट बघत असतात. कोणी आपल्या समोर अन्नदाता येते का ? असा प्रश्न आज त्या अनाथ मुलांच्या मनामध्ये खेळत असतो. तर हा एक आदर्श समितीचा मंगेश झाडे सतत गरिबांना व अनाथ मुलांना रस्त्यावर शोधून शोधून त्यांना अन्न वाटप करत असतो. आजही कोरोना काळात ही समिती त्यांची भूक भागवते. अनाथ मुलांना चपला,कपडे सुद्धा वाटप केले.
आजही आदर्श समितीचे मंगेश झाडे कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहे. यावेळी अशिष तीवरी, राम शुक्ला, कैलास झाडे, रमेश भोयर, शिवरामकृष्णन, सुयोग चरडे, शैलेश सक्सेना, सुरेंद्र काटकर आणि अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते.