कळंब एमआयडीसी परिसरातील गोदामावर छापा, ३४ लाखांचा गहू, तांदूळ जब्त

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12614*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

170

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,यवतमाळ-कळंब एमआयडीसी परिसरातील एका गोदामावर कळंब पुरवठा निरीक्षकांसह एलसीबी पथकाने धाड टाकून ३४ लाखांचा गहू, तांदळाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवार, दि. २६ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून सराईत धान्य तस्करासह एकाला अटक करण्यात आली.
सराईत धान्य तस्कर शेख रहिम शेख करीम (वय ४४)रा. कळंब माथा ह.मु. स्वस्तिक नगर, वर्धा आणि फिरोज युसूफ खान वय २७ वर्ष रा. इस्लामपुरा कळंब अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. शुक्रवारी कळंब पोलिसांनी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शासकीय धान्य दुकानातील तांदुळ काळ्या बाजारात विक्री करीत जात असल्याची माहिती यवतमाळ एलसीबी पथकाला मिळाली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पुरवठा निरीक्षक आणि एलसीबीतील अधिकारी कर्मचारी कळंब एमआयडीसी परिसरातील एका गोदामाकडे रवाना झाले. यावेळी काही मजूर ट्रक क्रमांक एमएच-४८-एच-७३७0 तांदळाचे पोते खाली उतरवताना दिसले. यावेळी याच गोदामाच्या बाजुला पार्टिशन केलेले दुसरेही गोदाम दिसले. या प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण गहु, तांदुळ आणि दोन ट्रक असा एकूण ३३ लाख ९७ हजार ९५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले.