ज्येष्ठ लेखक, संपादक आनंद अंतरकर यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12604*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

456

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : पुणे : हंस, मोहिनी व नवल या दिवाळी अंकांचे संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचे शनिवारी दुपारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८0 वर्षांचे होते. सुमारे महिन्यापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णशय्येवर असताहीनाही ते दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. हॉस्पिटलमधे जाण्यापूर्वीच आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे काम बर्‍याच प्रमाणात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांची पत्नी प्रियदर्शिनी (कै. ग दि . माडगूळकर यांची कन्या), पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई सुप्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू आहेत. सुप्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर हय़ा त्यांच्या भगिनी होत.