विकृत मामाच्या वाढल्या उचापती, भाचीलाच केले गर्भवती

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12595*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

163

विकृत मामाच्या वाढल्या उचापती, भाचीलाच केले गर्भवती

विदर्भ वतन,वणी-विदर्भ वतन, यवतमाल-मामाच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेने २0 आॅगस्ट रोजी विष प्राशन केले. विश प्राशन केल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. चार दिवसांनी तिला रुग्णालयातून सुटी झाली. २५ तारखेला पीडितेने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत ही कहाणी पोलिसांना सांगितली. मात्र नातेवाईक असल्याने पीडिता तक्रार द्यायला कचरत होती. अखेर ती तक्रार न देताच परत गेली.
एका १७ वर्षीय कुमारिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका विकृत मामाच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रशांत (३८) असे अत्याचार करणा-याचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवाशी आहे. गेल्या वर्षभरापासून तो पीडितेवर अत्याचार करीत होता. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले.
सविस्तर वृत्त असे की पीडिता कुमारिका (१७) ही शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या एका गावातील रहिवाशी आहे. ती आपल्या आजीसह राहते. आरोपी प्रशांत (३८) हा राजुरा येथील रहिवाशी आहे.
तो गेल्या वर्षभरापासून पीडितेच्या गावी राहायला गेला होता. तो गावातच पत्नीसह पीडितेच्या घरी राहत होता. पीडिता ही त्याच्या दूरच्या नात्यात येते. नातेवाईक असल्याने पीडितेचे मामाशी नेहमी बोलणे चालणे असायचे. मात्र, मामाच्या मनात काही वेगळेच होते. एके दिवशी मामाने पीडिता घरी एकटी असताना टीव्हीचा आवाज मोठा करून मामाने पीडितेवर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मामाने पीडितेला सातत्याने धमकी देत हे कृत्य सुरूच ठेवले. दरम्यान, पीडितेला गर्भधारणा झाली. त्यामुळे आरोपीने पीडितेचा गर्भपात करवला.