खर्रा थुकने जीवावर बेतले, वाहनातून पडून युवकाचा मृत्यु

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12587*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

107

विदर्भ वतन,नरखेड-नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील जिनिगी परिसरात मोवाड रस्त्यावर ट्रकमधून पडून प्रफुल्ल बंडू बागडे (वय २७, रा. पुसला, ता. वरूड) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास जामगाव (ता. नरखेड) येथून परत बोलेरो (पिकअप) या वाहनाने परत पुसला जात असताना असतात जिनिग परिसरात पिकअपमधून खर्रा थुकायला गेला असता त्याचा तोल गेला व तो रस्त्यावर पडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे उपचाराठी आणले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली व घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा पुढील तपास जलालखेडा पोलिस करीत आहे.