मल्याळम् चित्रपट निर्माते, शेफ नौशाद यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12582*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

200

मल्याळम् चित्रपट निर्माते, शेफ नौशाद यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,तिरुवानंतपूरम – प्रसिद्ध मल्याळम् चित्रपट निर्माते आणि शेफ नौशाद यांचे आज सकाळी निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. केरळमधील तिरुवल्ला येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांची पत्नी शीबाचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात १३ वर्षांची एक मुलगी आहे.

चित्रपट निर्माते आणि विख्यात शेफ नौशाद ३ वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २ आठवड्यांपूर्वी त्यांची पत्नी शीबाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर पोटाचा त्रास वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मणक्याचा आणि हृदय विकाराचाही त्रास जाणवत होता. त्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.