Home Breaking News खासगीकरण करणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे; मोदींच्या जिवलग मित्राकडूनच टीका

खासगीकरण करणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे; मोदींच्या जिवलग मित्राकडूनच टीका

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12572*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

112 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वर्धा – खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे, तसेच मोदी सरकारचे आर्थिक धोरण म्हणजे जॉबलेस धोरण असल्याची टीका मोदींचे जिवलग मित्र प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मोदींचे वागणे बदलले असून दोस्त दोस्त ना राहा असा सूर जाणवत आहे. प्रवीण तोगडिया वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कार्यकर्ता संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी खासगीकरणावरही टीका केली.

भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खाजगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असंच आहे, असं ते म्हणाले.

माझ्यासोबत बसले तर त्यांना समजावून सांगू

नरेंद्र मोदी माझे मोठे भाऊ आहेत. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. नरेंद्र मोदी आता सोबत बसत नाही. माझ्यासोबत बसले तर त्यांना काही गोष्टी समजावून सांगू, असा चिमटाही तोगडिया यांनी काढला.