Home Breaking News कामे आताच उरकून घ्या! सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल १२ दिवस सुट्टी

कामे आताच उरकून घ्या! सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल १२ दिवस सुट्टी

0
कामे आताच उरकून घ्या! सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल १२ दिवस सुट्टी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुढील सप्टेंबरचा जवळपास अर्धा येणारा महिना सुट्ट्यांचा असणार आहे. या सप्टेंबर महिन्यात १२ सुट्ट्या आहेत. भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या यादीनुसार, सप्टेंबरमध्ये देशभरातील बँकांना एकूण ७ सुट्ट्या असतील. परंतु काही राज्यांमध्ये विशेष सुट्या असणार आहेत. त्याशिवाय सप्टेंबरमध्ये ६ साप्ताहिक सुट्या असतील.

पुढील सप्टेंबर महिन्यातील बँकांना असणाऱ्या सुट्ट्या पुढीलप्रमाणे – ५ सप्टेंबर – रविवार, ८ सप्टेंबर – श्रीमंत शंकरदेवा तिथि (गुवाहाटी), ९ सप्टेंबर-तीज हरितालिका (गंगटोक),१९ सप्टेंबर – गणेश चतुर्थी/संवत्सरी (चतुर्थी पक्ष)/विनायक चतुर्थी/वरसिद्धि विनायक व्रत (अहमदाबाद, बेलापुर, बेंगलुरु, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपुर, पणजी),११ सप्टेंबर – महीन्याचा दूसरा शनिवार/गणेश चतुर्थी दूसरा दिवस (पणजी),१२ सप्टेंबर -रविवार, १७ सप्टेंबर – कर्मा पूजा (रांची), १९ सप्टेंबर – रविवार,२० सप्टेंबर-इंद्रजात्रा

(गंगटोक), २१ सप्टेंबर – श्री नारायण गुरू समाधी दिवस (कोची, तिरुवंतपुरम) २५ सप्टेंबर – महिन्याचा चौथा शनिवार,२६ सप्टेंबर-  रविवार अशा आहेत.दरम्यान ऑनलाईन बँकिंगचे कामकाज प्रभावित होणार नाही. म्हणजेच ग्राहकांना डिजिटल बँकिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. ते नेहमीप्रमाणे आपली रक्कम ट्रान्सफर करू शकतील.