Home Breaking News काबूल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू; बचाव मोहिमेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

काबूल हल्ल्यात 110 जणांचा मृत्यू; बचाव मोहिमेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12564*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

591 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबुल – गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्थानमध्ये लोक जिवाच्या आकांताने पळत आहेत. अफगाणिस्तान सोडून अनेकांना दुसऱ्या देशात जायचं असल्याने कबूल विमानतळवर गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन आयसिसने काबुल विमानतळावर आत्मघातकी हल्ला केला आणि यात अमेरिकन सैन्यासह एकूण 110 जणांचा मृत्यू झाला. यानंतर आता जर्मनी, स्पेन आणि स्वीडनने अफगाणमधील आपली बचाव मोहिम थांबवली आहे. असं असलं तरी अमेरिका, ब्रिटनसह इतर नाटो देश 31 ऑगस्टपर्यंत बचाव मोहिम सुरूच ठेवणार आहेत. तर तालिबान्यांनीही बचाव मोहिमेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

 “जर्मनीने अफगाणिस्तानमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मोहिम थांबवली आहे. जर्मनीने एकूण 45 देशांच्या 5,347 लोकांना बाहेर काढलं. यात 4,000 पेक्षा जास्त नागरिक अफगाणिस्तानचे आहेत”, अशी माहिती जर्मनीचे संरक्षण मंत्री एनीग्रेट क्रेंप-कॅरेनबाउर यांनी दिली.

तर, स्पेनने आतापर्यंत 1900 अफगाण नागरिकांना मदत केलीय. याशिवाय स्पेनिश मदत कर्मचारी, अफगाण मित्र देशांचे सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासह 81 सैनिक आणि दूतावास अधिकारी यांनाही मदत करण्यात आली. स्पनने अमेरिका, पुर्तगाल, यूरोपीय संघ, नाटोसोबत हे मदत कार्य केलं.

दरम्यान, स्वीडनने काबुल विमानतळावरील बचाव मोहिम थांबवलीय. स्वीडनने त्यांची मोहिम पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी अद्याप अनेकजण अफगाणमध्ये अकडलेले आहेत. स्वीडनचे परराष्ट्र मंत्री ऐन लिंडे यांनी त्यांच्या मोहिमेचं लक्ष्य पूर्ण झाल्याचं नमूद केलंय. यामागे तालिबान्यांनी अफगाणी नागरिकांना अडवल्याचं कारण त्यांनी सांगितलं. स्वीडनने 500 हून अधिक स्वीडिश लोकांना बाहेर काढलं. याशिवाय स्थानिक कर्मचारी, काही महिला कार्यकर्त्या आणि पत्रकारांसह इतर 1,100 लोकांनाही स्वीडनने अफगाणमधून बाहेर पडण्यास मदत केली.