विदर्भ वतन,नागपूर-संसदीय स्थायी ग्राम विकास समितीने नुकतीच नागपूर ग्रामीण तहसील अंतर्गत उमरगाावाला भेट दिली आणि ग्राम पंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. या संसदीय समितीमध्ये अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव,सदस्य राजवीर दिलेर, एकेपी चिनराज, जनार्दन मेश्राम, तालारी रंगे याचा समावेश होता. समीतीने महिला बचत गट, घरकुल योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीचे काम पाहून समाधान व्यक्त केले. नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, निशांत मेहरा, राहूल सोडके, राजेश कुमार, सरपंच चंद्रशेखर राउत, उपसरपंच व सदस्यगण उपस्थित होते.

