Home Breaking News ऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर

ऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर

0
ऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर

ऐतिहासिक औरंगाबाद बनलेय वाघांचा पुरवठा करणारे शहर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : औरंगाबाद – राज्यातील ऐतिहासिक शहर आणि मराठवाड्याच्या राजधानीचे शहर अशी ओळख असणारे औरंगाबाद शहर वाघांचा पुरवठा करणारे शहर बनले आहे. मागील दहा वर्षात येथून महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह झारखंड, पंजाब आणि मध्य प्रदेश राज्यातील प्राणीसंग्रहालयांना १८ वाघ दिले गेले आहेत. आताही येथे १२ वाघ आहेत.

सततची वाघांची घटती संख्या हा जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. परंतु हे शहर मात्र याला अपवाद ठरले आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात उलट वाघांच्या वाढत्या संख्येची चिंता भेडसावत आहे.वाघांच्या प्रजननासाठी येथील वातावरण अनुकूल ठरले आहे.त्यामुळे मागील काही वर्षांपासून येथे वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे पण त्या तुलनेत इथे वाघांसाठी पुरेसे पिंजरे नाहीत. त्यामुळे केंद्रीय वन मंत्रालयाकडून अधूनमधून येथील वाघ, इतर प्राणी संग्रहालयांना दिले जातात. मागील २६ वर्षात या ठिकाणी ३५ वाघ जन्मले आहेत. एवढ्या वाघांना इथे ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात येथून मुंबई, बोरीवली, पुणे, जमशेदपूर, मूकूंदपूर, झिराकपूर, इंदूर याठिकाणी १८ वाघ दिले आहेत. सध्या याठिकाणच्या वाघांची संख्या १२ आहे.