Home Breaking News आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात हजारो रुपयांची वाढ

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात हजारो रुपयांची वाढ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12540*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

109 views
0

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात हजारो रुपयांची वाढ

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा स्वयंसेविका व आशा गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.