काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला, १३ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12536*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

227

काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला, १३ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबूल – अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी हल्ले झाले आहेत. या हल्ल्याची खात्री पेंटागन प्रवक्त्यांनी केली आहे. विदेशी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेननं काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

“काबुल विमानतळाच्या ऐबी गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवलं. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे.”, असं अमेरिकेचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.