Home Breaking News गरीब मजुराच्या मुलीने घडविला इतिहास, भंडा-याची शिवाणी शिकणार लंडनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये

गरीब मजुराच्या मुलीने घडविला इतिहास, भंडा-याची शिवाणी शिकणार लंडनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये

0
गरीब मजुराच्या मुलीने घडविला इतिहास, भंडा-याची शिवाणी शिकणार लंडनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये

गरीब मजुराच्या मुलीने घडविला इतिहास, भंडा-याची शिवाणी शिकणार लंडनच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये

विदर्भ वतन, नागपूर-पर्शिमाला जिद्द आणि चिकाटीची जोड असली तर माणसाला काहीही अशक्य नसते. भंडारा जिल्हय़ातील शिवानी वालदेकर या विद्यार्थिनीने समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या परदेशी शिष्यवृत्तीने स्वत:ला घडविले. आता ती लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयी संशोधन करण्यासाठी जाणार आहे.
भंडारा जिल्हय़ात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या शिवानीचे वडील गंगाधर जानूजी वालदेकर हे मजूर म्हणून हातात पडेल ते काम करतात. आई कांचन गंगाधर वालदेकर गृहिणी आहे. आई डी. एड. झालेली; परंतु आईच्या वडिलांनी त्यांना नोकरी करू दिलेली नाही. घरात वडील एकटेच कमावते. त्यांच्या मजुरीच्या भरवशावर घरचा उदरनिर्वाह चालतो. घरात तीन बहिणी, गरीब कुटुंब; परंतु आई उच्चशिक्षित व स्त्रीवादी विचाराची असल्यामुळे आपल्या मुलींनी फार शिकावे, असे वाटायचे. त्यामुळे तिन्ही मुलींना त्यांनी शिकवले. कालांतराने दोन मुलींचे लग्न झाले. सर्वात लहान शिवानी लहानपणापासूनच हुशार व तल्लख बुद्धीची होती. दहावीपर्यंतचे शिक्षण शिवानीने नूतन कन्या शाळा भंडारा येथे केले. त्यानंतर ११ पासूनचे तर एम.ए.पर्यंतचे शिक्षण जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे केले. शिक्षणाप्रती आत्मियता बघून ती पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेली.
समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणार्‍या योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असते. त्यातूनच तिला परदेशी शिष्यवृत्तीची माहिती समजली व ती त्याचा लाभ घेण्याकरिता तिने अर्ज सादर केला. विभागाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. माझी लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयी संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे माझे परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे, स्वप्न सकार झाल्याचे यावेळी शिवानीने सांगितले.