Home Breaking News सहा. पोलिस उपनिरीक्षकला लाच घेताना रंगेहात पकडले

सहा. पोलिस उपनिरीक्षकला लाच घेताना रंगेहात पकडले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12523*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

143 views
0

सहा. पोलिस उपनिरीक्षकला लाच घेताना रंगेहात पकडले

विदर्भ वतन, नागपूर-बिअरबार मालकाकडून दरमहा ६ हजार रपयांची हप्त्याची मागणी करणार्‍या कळमेश्‍वर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई करून त्यांना पैसे स्वीकारताना रंगेहात पकडल्याची घटना २४ ऑगस्टला घडली. सहा. पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश शिवनारायण शर्मा, असे आरोपीचे नाव आहे.

प्रकरणातील तक्रारदार हे कळमेश्‍वर येथील रहिवासी आहेत. त्यांचा बिअर बारचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे दारूची होम डिलिवरीचीही सुविधा आहे. कळमेश्‍वर ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश शिवनारायण शर्मा (५२) यांनी तक्रारदराला प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या कारणांवरून फसविण्याची धमकी दिली. तसेच बिअर बार मालकाला त्रास न देण्यासाठी आणि १0 ते ११ वाजता दरम्यान होम डिलीव्हरी करण्याची मुभा देण्यासाठी ६ हजार रु. हप्त्याची मागणी केली. तक्रारदाराला सहायक पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश शिवनारायण शर्मा यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यात पडताळणी दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील सहा. पोलिस उपनिरीक्षक शर्मा यांनी तक्रारदार यांना दारूची होम डिलिव्हरी करताना वेगवेगळ्या कारणांवरून केस करू नये म्हणून दरमहा ६ हजार रु. याप्रमाणे मागील महिन्याचे आणि सुरू महिन्याचे मिळून १२ हजार रु. लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १0 हजार रु. लाच रक्कम २४ ऑगस्टला फेटरी हनुमान मंदिर समोर काटोल रोड येथे स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यांना रंगेहात पकडले. सहा. पोलिस उपनिरीक्षक जयप्रकाश शर्मा यांच्या विरुध्द कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.