अंधश्रद्धा मारहाण प्रकरणात १३ जणांना अटक

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12512*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

392

अंधश्रद्धा मारहाण प्रकरणात १३ जणांना अटक

विदर्भ वतन, चंद्रपूर-जीवती : जीवती येथे रविवारी सायंकाळी भानामतीच्या संशयावरून भरचौकात दलित कुटुंबातील लहान मुले व वृद्धांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात सात जण जखमी असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. पाच गंभीर जखमींना शनिवारी चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील १२ किमी वर अंतरावर असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून संपूर्ण गावक-यांनी मिळून दलित समाजातील एका कुटुंबातील सदस्यांना भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण केली. या मारहाणीत शांताबाई कांबळे (५३), शिवराज कांबळे (७४), साहेबराव हुके (४८), धम्मशीला हुके (३८), पंचफुला हुके (५५), प्रयागबाई हुके (६४), एकनाथ हुके (७0) हे कुटुंबीय जखमी झाले आहेत. वणी खुर्द या गावात एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा संशय होता. यातून त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी जाऊन त्यांना सोडविले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू असल्याचे गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी म्हटले आहे. शनिवारी घटना उघडकीस आल्यानंतर लगेच गावात शांतता बैठक घेण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष दिल्या जात आहे. १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिवती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी सांगितले.