सराफांनी पुकारला कडकडीत बंद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12507*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

126

सराफांनी पुकारला कडकडीत बंद

विदर्भ वतन,नागपूर- केंद्र शासनाने सोन्याच्या दागिन्यांवरील ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’च्या (हॉलमार्क रूल) सक्तीविरोधात सोमवारी, २३ आॅगस्ट रोजी सराफा व्यावसायिकांनी राज्यात लाक्षणिक बंद पुकारला होता. नागपुरातही या संपाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. व्यापा-यांच्या या बंदमुळे नागपूरसह विदर्भात जवळपास शंभर कोटींवरील सराफा बाजारातील उलाढाल ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे.
या राज्यव्यापी लाक्षणिक बंदमध्ये नागपूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सराफा व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. यामुळे जिल्ह्यातील ४0 कोटींपेक्षा अधिक तर विदभार्तील १00 कोटी रुपयांची सराफा बाजारातील उलाढाल ठप्प झाली. शहरातील इतवारीतील सराफा ओळीतील धरमकाटा समोर व्यापा-यांनी निदर्शने केली. सराफ व्यावसायिकांनी हॉलमार्किंग प्रक्रियेला कधीही विरोध केला नाही. मात्र, एचयूआयडीच्या सक्तीमुळे त्याची गती मंदावली आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेवर दागिने देणे कठीण झालेले आहे. व्यापा-यांचा प्रक्रियेलाही विरोध नाही. प्रथम हॉलमार्क सेंटरची पायाभूत सुविधा अद्ययावत करावी. त्यानंतरच सक्ती करावी. नागपूर जिल्ह्यातील तीन हजार सराफांसाठी फक्त दोन हॉलमार्क सेंटर्स आहेत. तसेच एकदा हॉलमार्क केलेल्या वस्तूंना लहान अथवा मोठे करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांच्या मापाचे दागिने कसे द्यायचे असा नवा प्रश्न आहे. केंद्र सरकारने ही जाचक अट रद्द करावी अथवा त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.