फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमधील नवव्या मजल्यावरून उडी घेऊन प्राध्यापिकेने केली आत्महत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12503*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

205

फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमधील नवव्या मजल्यावरून उडी घेऊन प्राध्यापिकेने केली आत्महत्या

विदर्भ वतन, नागपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. जोत्सना मेर्शाम यांनी बेलतरोडी हद्दीत त्यांच्या मावशीच्या फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमधील नवव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ आॅगस्टला पहाटे ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. पतीच्या निधनाने डिप्रेशनमध्ये गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार अष्टविनायकनगर, जयताळा येथे राहणा-या जोत्सना सुधीर मेश्राम (५६) या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात केमेस्ट्री विभागाच्या विभागप्रमुख होत्या. त्यांना सिद्धार्थ मेश्राम नावाचा मुलगा आहे. तो अमेरिकेत राहतो. त्यांचे पती डॉ. सुधीर मेर्शाम हे जळगाव विद्यापीठाचे कुलगुरु होते. तसेच राजीव गांधी बायोटेकचे माजी प्रमुख होते. १५ मार्च २0२१ रोजी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हापासून जोत्सना या तणावात राहत होत्या. सतत पतीची आठवण येत असल्याने त्या दु:खी राहत होत्या. २ महिने त्या मुलाकडे अमेरिकेतही राहून आल्या होत्या. तेथून आल्यावर त्या एक आठवडा त्यांच्या घरी जयताळा येथे राहिल्या. नंतर एकटेपणा जाणवत असल्याने त्या त्यांचे मावसा विनय राजाराम खोब्रागडे (६४) यांच्या घरी बेलतरोडी हद्दीत फॉच्यरुन श्री अपार्टमेंट फ्लॅट क्र.९0४, सी विंग ९ वा माळा येथे १६ आॅगस्टला रहायला आल्या. दुस-या दिवशी त्या सकाळी १0 वाजता विद्यापीठात त्यांच्या कामावर गेल्या. पुन्हा त्यांचे कपडे घेऊन त्या मावशी रार्जशी खोब्रागडे यांच्या घरी रहायला आल्या. त्यांना बी.पी. आणि शूगरचा त्रास होता. त्यात पती निधनामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
२२ आॅगस्टला सायंकाळी ५.३0 वाजता विनय खोब्रागडे, त्यांच्या पत्नी रार्जशी, मुलगा आणि सून जोत्सना यांना घेऊन त्यांचे साळे प्रमोद शेंडे यांच्या यादवनगर कामठी रोड येथील घरी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून जेवण आटोपून सर्व जण रात्री १0.५0 वाजताच्या सुमारास घरी परतले. विनय हे समोरच्या खोलीत झोपले तर रार्जशी आणि जोत्सना हे आत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. पहाटे ४.३0 वाजताच्या सुमारास रार्जशी यांना जाग आली. तेव्हा त्यांना जोत्सना दिसल्या नाही. त्यामुळे त्यांनी घरच्यांना जागे केले आणि सर्व जोत्सना यांना शोधू लागले. दरम्यान, ९ व्या माळ्यावर असलेल्या त्यांच्या घराच्या किचनच्या गॅलरीतून त्यांनी खाली पाहिले असता, त्यांना जोत्सना खाली पडलेल्या दिसल्या. त्यांनी खाली जाऊन पाहिले असता जोत्सना यांचा मृत्यू झाल्याचे दिसले. त्यांनी लगेच खाली चौकीदारला कळवित पोलिसांनाही माहिती दिली. याप्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.