भाजपा नेते श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक, ४ दिवसांची पोलीस कोठडी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12488*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

123

भाजपा नेते श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक, ४ दिवसांची पोलीस कोठडी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : कोलकाता – पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि भाजपा नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे. १० कोटींची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी हे विधानसभा निवडणुकांपूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षातून भाजपात गेले होते. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

श्यामाप्रसाद मुखर्जी हे तब्बल ३४ वर्ष विष्णापूरचे नगराध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी कामाचे कंत्राट देण्यासंदर्भात १० कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बानकुराचे पोलीस अधीक्षक धृतिमान सरकार यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘९.९१ कोटी रुपयांच्या अफरातफरीबाबत विष्णापूरच्या एसडीपीओकडून चौकशी झाली होती. या चौकशीत समाधानकारक उत्तरे न दिल्याने मखर्जींना अटक करण्यात आली.’

दरम्यान, यापूर्वी शारदा चिटफंड घोटाळ्यातही श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव आले होते. मात्र आता करण्यात आलेल्या कारवाईला भाजपा नेत्यांनी विरोध केला आहे. ‘त्यांच्यावर आरोप त्यावेळचे आहेत जेव्हा ते तृणमूल काँग्रेसमध्ये होते, मग सरकार आता जागे झाले का?’, असा सवाल भाजपा नेते उपस्थित करत आहेत.