Home Breaking News लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जामीन मंजूर

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जामीन मंजूर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12479*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

32 views
0

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना जामीन मंजूर

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नाशिक – आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांचा अखेर जामीन मंजूर झाला आहे. पण जामीनासाठी कोर्टाने काही अटी-शर्ती ठेवल्या असून, या अटी-शर्तींनुसार आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांना दर सोमवारी नाशिकच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. न्यायालयाने अटी शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी कोर्टात सध्या खटला सुरु आहे. वैशाली यांच्या वकिलांनी १४ ऑगस्टला देखील जामीन अर्ज केला होता. पण त्यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती.याशिवाय ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला होता.शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत विषय चर्चेला आला. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे