Home Breaking News माजी पंतप्रधान स्व़ राजीव गांधी यांना अभिवादन

माजी पंतप्रधान स्व़ राजीव गांधी यांना अभिवादन

143 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – दक्षिण नागपुर शहर कॉंग्रेस कमेटीच्या माध्यमातून प्रदेश सचिव गिरीश पांडव यांच्या अध्यक्षतेत माजी नगरसेवक वासुदेव ढोके यांच्या निवासस्थानी माजी पंतप्रधान स्व़ राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक मनोज गावंडे , माजी नगरसेवक विजय बाभरे, अँड. अशोक यावले, तनवीर अहमद, सुभाष भोयर, प्रविण सांदेकर शहर कॉंग्रेस कमेटी पदाधिकारी भाऊराव कोकणे, प्रा. राजेश रहाटे, मामा राऊत, किशोर गिद, बालुु सातपुते, बालु शेख, डॉ. अरविंद बुटले, प्रमिला राऊत ब्लॉक ५ चे अध्यक्ष विश्वेश्वर अहिरकर, रामभाऊ कावडकर, कल्पना जोगे, निलेश चंद्रिकापुरे, भोलानाथ कुचनकर, तसेच युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष सुशांत लोखंडे, विपुल गजभिये, शत्रू चंदेल, अरविंद क्षिरसागर, पिंटू तिवारी, शिवा अरखेल, निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक माजी नगरसेवक वासुदेव ढोके यांनी केले़ काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्व़ राजीव गांधी यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश पांडव यांनी कार्यकर्त्यांना केले़ त्याचप्रमाणे पक्ष संघटनेसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे असेही सांगितले़ कार्यक्रमात आभार प्रदर्शन मामा राऊत यांनी केले़ यावेळी रमेश बडोदेकर,गिता महाकाळकर, निलीमा घाटोडे, नरेश खडसे, सुरेश ईटनकर, मनोज चौधरी, अशोक राऊत, विजय वानखेडे, शंकरराव पुंड, सुभाष पेंढारकर, राजु बेलखोडे, सचिन मेंढुले, राजु वानखेडे, अमोल धरमारे, रमेश वानखेडे, नरेंद्र लिल्हारे, बापुराव भगत, संजय चिंचमलातपुरे, संजय गभने,सचिन निबंरते, अशोक माहुले, अहिंसक मुन, शेखर पांडे, रमेश ठाकरे, राजेश इंगोले, विजय सालोटकर, शुभम पालांदुरकर उपस्थित होते़