जिपच्या बांधकाम विभागात ६४ लाखांचा घोटाळा, आरोपींवर दुसरा गुन्हा दाखल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12457*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

124

जिपच्या बांधकाम विभागात ६४ लाखांचा घोटाळा, आरोपींवर दुसरा गुन्हा दाखल

विदर्भ वतन,नागपूर-जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मेसर्स नाना कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्थेतर्फे ६४ लाख १0 हजार १00 रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. परंतु या प्रकरणाची विभागाकडून सदर पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतरही गुन्हा नोंदविल्या गेला नव्हता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी शनिवारला पोलिस अधिका-यांसह जि.प.तील अधिका-यांची रविभवन येथे तडकाफडकी बैठक बोलाविली. या बैठकीत त्यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. यानंतर पोलिस विभागानेही त्वरित या प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल केला. यापूर्वी या प्रकरणात जि.प.च्या लघु सिंचन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आरोपी रोशन पंजाबराव पाटील आणि मंजूषा कुसुमकार पाटील (रा. गणेश मंदिर धंतोली काटोल) यांच्या विरुध्द सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद दोन्ही आरोपींनी ५ नोव्हेंबर २0१९ ते ८ जुलै २0२0 दरम्यान त्यांच्या मेसर्स नाना कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था काटोलच्या माध्यमातून सदर हद्दीत जि.प. बांधकाम विभाग येथे आॅनलाईन टेंडरच्या माध्यमातून ४ कामे मिळविली. त्यासाठी ६४ लाख १0 हजार १00 रुपयाची सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून भारतीय सेट बँक (एसबीआय) शाखा काटोल येथे जमा केले होते. आरोपींनी मूळ प्रमाणपत्र संबंधीत विभागामध्ये न ठेवता रंगीत झेरॉक्स सादर करून मूळ मुदत ठेवी प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून घेतले. त्यांचा चार कामाचा दोष निवारण कालावधी पूर्ण झालेला नसताना तसेच कार्यलयाकडून कोणतीही लेखी परवाणगी न घेता आरोपींनी एस.बी.आय. शाखा काटोल येथून एकूण सुरक्षा ठेवी आणि अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे एकूण ६४,१0,१00 रुपये परस्पर बँकेतून काढून घेतले. अशाप्रकारे आरोपींनी जिल्हा परिषदेची फसवणूक केली. याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटल्यानंतर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारी बैठक घेऊन त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर यांच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी आरोपींविरुध्द विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.