मेडिकल चौकातील पॉश इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12450*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

मेडिकल चौकातील पॉश इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांचा छापा
-१६ वर्षीय मुलीसह दोघींना घेतले ताब्यात,दलालालाही अटक

विदर्भ वतन,नागपूर- मेडिकल चौकातील पॉश इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला. येथून १६ वर्षीय मुलीसह दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सागर काजनीकर (२५) नामक दलालालाही अटक करण्यात आली आहे.
सागर काजनीकर (रा. कावरापेठ क्रॉसिंग, यशोधरानगर) व त्याची नातेवाईक नितू कोहाड हे दोघे मेडिकल चौकातील अर्जुन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ५१0 मध्ये सेक्स रॅकेट चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सागरला अटक केली असून नितू कोहाड ही फरार आहे. सागरने किरायाने सलून घेतले होते. तेथे तो वेगवेगळ्या मुलींना सेक्स रॅकेटसाठी ठेवायचा. अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी मध्यप्रदेशातील जबलपूरमधील आहे. ती वयाच्या १४ व्या वर्षांपासून देहव्यापार करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने, एसीपी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनात पीआय भोसले, एपीआय मयूर चौरसिया, पीएसआय मंगला हरडे, नरेंद्र ठाकूर, रवींद्र शेंडे, प्रवीण अहीर आणि सागर ठाकरे यांनी केली.