Home नागपूर प्रतापनागर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

प्रतापनागर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

0
प्रतापनागर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

प्रतापनागर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन

विदर्भ वतन, नागपूर-भाजपा दक्षिण पश्चिम महिला मोर्चाच्या वतीने प्रतापनागर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षक तायडे व पोलीस कर्मचाऱ्यांना हिंदू परंपरेनुसार राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. रक्षासूत्र बांधून ओवाळणी मध्ये तुम्ही आम्हाला कायम सुरक्षा प्रदान कराल ही हमी तुमच्या कडून पाहिजेत. असे निवेदन सौ. वर्षा दिलीप चौधरी दक्षिण पश्चिम महिला मोर्चा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात दिले. यावेळी प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. आश्विनीताई जिचकार, शहर महामंत्री मन्ीाषाताई काशीकर, कल्याणीताई तेलंग, अनुसयाताई गुप्ता, वीणाताई खानोरकर, महामंत्री कल्पना तडस, रंजना गौरीहर, सुहासिनी दियेवार, लक्ष्मी राया, कविता पाटील, रिंकी मस्के, रुपल दोडके, शालिनी बुल्ले, राजश्री डोंगरे याप्रसंगी उपस्थित होते.