Home Breaking News श्रीलंकन नौसेनिकांची तुफान दगडफेक; ६० भारतीय मच्छीमार नौकांचे नुकसान

श्रीलंकन नौसेनिकांची तुफान दगडफेक; ६० भारतीय मच्छीमार नौकांचे नुकसान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12437*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

109 views
0

श्रीलंकन नौसेनिकांची तुफान दगडफेक; ६० भारतीय मच्छीमार नौकांचे नुकसान

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : रामेश्वरम – मासेमारीसाठी गेलेल्या भारतीय मच्छिमारांच्या बोटींवर श्रीलंकन नौदलाच्या जवानांनी रात्री तुफान दगडफेक केली. त्यात ६० भारतीय मच्छीमार नौकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यात एकही मच्छीमार जखमी झालेला नाही. या घटनेत मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री उशिरा कच्चातीवू येथे घडली.

भारतीय मच्छीमारांच्या काही नौका शनिवारी रात्री मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेल्या होत्या. त्यावेळी श्रीलंकेच्या नौदलाचे जवान ५ जहाजांमधून तिथे आले व त्यांनी या मच्छीमारांवर तुफान दगडफेक केली. त्यात मच्छीमारांच्या ६० बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत अनेक मच्छीमारांच्या जाळ्यांचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर मच्छीमारांनी केंद्र व राज्य सरकारकडे तक्रार केली आहे. यावर सरकारने तोडगा काढावा आणि आमच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. १० दिवसांपूर्वीही रामेश्वरमजवळच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौसैनिकांनी दगडफेक केली होती.