Home Breaking News तालिबान्यांनी काबुलला चारही बाजूंनी घेरले; विमानतळावर चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू

तालिबान्यांनी काबुलला चारही बाजूंनी घेरले; विमानतळावर चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12419*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

73 views
0

तालिबान्यांनी काबुलला चारही बाजूंनी घेरले; विमानतळावर चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबूल – अफगाणवर तालिबानने ताबा मिळवल्याने अनेक अफगाण नागरिकांनी अफगाण सोडण्यासाठीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काबूल विमानतळावर हजारो अफगाण नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. मात्र विमानतळावरुन पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली असून, अफगाणिस्तानातील सामान्य नागरिक ठार झाल्याचे माहिती समोर आली आहे. रविवारी ब्रिटिश लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिक ठार झाले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या लोकांना अजूनही धोका असल्याचे दिसून आले आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून असे म्हटले आहे की, विमानतळावरील परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. मात्र आम्ही परिस्थिती सामान्य करण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गेल्या रविवारी काबूलवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर विमानतळावर मोठ्या संख्येनं लोक गर्दी करु लागले होते.आता अमेरिकेने )दिलेल्या इशाऱ्यामुळे लोकांची चिंता आणखीनच वाढली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. या इशाऱ्यात अमेरिकेने म्हटले आहे की, काबूल विमानतळाजवळ येऊ नका.काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट हल्ला करण्याची भीती त्यांना सतावतेय. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या नागरिकांना आधीच सतर्क केले आहे. मात्र काबूल विमानतळावर सतत गोंधळ सुरूच आहे.

देश सोडण्यासाठी हजारो लोक येथे गर्दी करत आहेत. त्यांच्या नियंत्रणासाठी अमेरिकन सैन्य तैनात आहे. अफगाणिस्तानात परिस्थिती सतत बिकट होत आहे.अशा परिस्थितीत अमेरिकेने आता आपल्या नागरिकांना विमानतळाकडे जाण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. सध्या काबूल विमानतळाचे नियंत्रण अमेरिकन सुरक्षा दलांच्या हातात आहे.अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितले की, त्यांनी विमानतळाच्या दाराबाहेर मोठी गर्दी जमू नये यासाठी सूचना जारी केल्या आहेत. सद्यस्थितीत विमानतळावर परिस्थिती बिकट आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबान्यांनी आता राजधानी काबुलला चारही बाजूंनी घेरले आहे. यामुळेच येथे हल्ल्यांचा धोका आणखी वाढला आहे.