अंगणवाडी सेविका दिनांक निहाय शासनाला परत करणार मोबाईल

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12412*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

127

अंगणवाडी सेविका दिनांक निहाय शासनाला परत करणार मोबाईल

-अंगणवाडी कर्मचारी सभेत निर्णय

विदर्भ वतन,नागपूर : पोषण आहार अभियानासाठी देण्यात आलेले शासकीय मोबाईल कामात येण्याऐवजी अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. नागपूर शहरातील अंगणवाडी सेविकांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यलयात मोबाइल परत करणार असल्याचे महाराष्टÑ राज्य आंगनवाडी कृती समितीच्या १७ आॅस्टलला झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा माया ढाकने यांच्या अध्यक्षतेत व उज्ज्वला नारनवरे सचिव, कल्पना अतकरे (तलवारकर) सचिव यांच्या उपस्थितीत नागपूर शहरातील आंगणवाडी सेविकांची सभा विजय मंडळ नागपूर येथे घेण्यात आली. या सभेत शासनाला मोबाइल परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ आॅस्टला दुपारी १ वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प १ जुना हनुमाननगर नागपूर, एकात्मिक बालविकास प्रकल्प २ ग्रेट नाग रोड नागपूर कार्यालयात मोबाइल परत करण्यात येतील. तसेच २५ आॅस्टला दुपारी १ वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प २ गांधीनगर कार्यालय, २६ आॅस्टला दुपारी १ वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प ३ रेशीमबाग नागपूर कार्यालय, २७ आॅस्टला दुपारी १ वाजता एकात्मिक बालविकास प्रकल्प मानवनगर व एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडी,कामठी कार्यालयात मोबाइल परत करण्यात येतील. अशी माहिती अंगनवाडी कर्मचारी सभेने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.