
राखी पौर्णिमा
नारळी पौर्णिमा।ही राखी पौर्णिमा।
भाऊ सारे जमा ।ताई घरी।।
भाऊ व बहीण ।अतूट बंधन ।
रक्षणार्थ सण । बहिणीच्या ।।
आनंदाचा क्षण । ताईचे औक्षण ।
रक्षेचे वचन । मागे ताई ।।
निरांजन वाती ।आनंदती नाती।
राखी भावा हाती। बांधीयेली ।।
गंध टिळा भाळी ।सुवर्ण कपाळी।
बहीण ओवाळी ।मनोभावे ।।
करता औक्षण। ताईस वंदन।
धरितो चरण ।भाऊराया ।।
सण आहे खास।नात्यातील आस।
रक्षणाचा वास । राखीलाही ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर

