मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश,मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी घेत असे दोन लाख रुपये 

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12396*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश,मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी घेत असे दोन लाख रुपये 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई- मुंबईत एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश झाला आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणामध्ये टॉप मॉडेल आणि अभिनेत्री अडकल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरी एक अभिनेत्री आहे. तिनेही टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मॉडेल आणि अभिनेत्री दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना पकडले आहे. या मॉडेल आणि अभिनेत्रींना मुंबई पोलिसांनी अटक केली नसली तरी त्यांना सेक्स रॅकेटच्या या जाळ्यातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अभिनेत्री आणि मॉडेलऐवजी रॅकेट चालवणार्‍या महिलेला अटक करण्यात आली आहे.
अटक केल्यानंतर चौकशीत ईशा खानने सांगितले की, ती गेली अनेक वर्षे हे सेक्स रॅकेट चालवत आहे. ती दोन तासांसाठी दोन लाख रुपये घेत असे. यामध्ये ती तिचे ५0 हजार रुपये कमिशन ठेवायची आणि उरलेले दीड लाख रुपये संबंधित मॉडेल आणि अभिनेत्रीला द्यायची. चौकशी दरम्यान, मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले की, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शूटिंग थांबले होते, काम उपलब्ध नव्हते. म्हणूनच ती सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली. हे रॅकेटमध्ये ईशा खान ग्राहकांशी संपर्क साधायची. ती मॉडेल, अभिनेत्री आणि कॉल गर्ल्सची प्रोफाइल आणि छायाचित्रे ग्राहकांसोबत शेअर करायची. ज्या ग्राहकांना आवडले त्यांच्यासोबत दर, तारीख आणि वेळ निश्‍चित केली जायची.
मग जुहूसारख्या पॉश भागात असलेल्या हॉटेल्समध्ये खोल्या बुक होत असे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ईशा खानला बनावट ग्राहक म्हणून संपर्क केला. ईशा खानला सांगितले की, तिला आणि तिच्या एका मित्राला टॉप मॉडेल हवे आहेत. यानंतर ईशा खानने व्हॉट्सअँपवर अनेक फोटो पाठवले. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दोन मुलींचे फोटो निवडले. त्यापैकी एकीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे आणि दुसरीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ईशा खानने प्रति मुलगी दोन तासांसाठी दोन लाख रुपयांमध्ये डिल केले. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी या डिलला होकार दिला. जुहू हॉटेल देखील बुक केले होते. गुरुवारी रात्री महिला दलाल आणि मॉडेल आणि अभिनेत्री हॉटेलच्या बाहेर पोहोचताच. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.