मुंबईतल्या ईपीएफओ कार्यालयातील घोटाळा,7 निलंबित 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबईतल्या ईपीएफओ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी आतापर्यंत सात कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले. देश कोरोना संकटात असताना सर्वसामान्यांच्या पीएफमधील २१ कोटींहून अधिक रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार अंतर्गत चौकशीत समोर आले होते. याप्रकरणी आधी ५ जणांचे निलंबन झाले होते आणि आता आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांपैकी एक सहाय्यक आयुक्त पदावरील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईतील कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचार्‍याने तब्बल २१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतर्गत इंटरनल ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे, मार्च २0२0 ते जून २0२१ दरम्यान सगळ्या देशाचे लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होते, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील ३७ वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा याने ही अफरातफर केली. जुलै २0२१ च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे ही फसवणूक उघडकीस आली. ८१७ स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा केला आणि एकूण २१.५ कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवले. या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी ९0 टक्के रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले

You missed