काबूल विमानतळावर २२0 भारतीय अडकले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12386*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

124

काबूल विमानतळावर २२0 भारतीय अडकले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली –अफगाणिस्तानचा तालिबानकडून पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेक नागरिकांची धडपड सुरू आहे. काबूल विमानतळावर मोठय़ा प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. गर्दीमुळे भारतीयांना विमानतळात जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे काबूल विमानतळावर २२0 भारतीय अडकले आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर हे भारतीयांच्या प्रतीक्षेत आहे. विमानतळावर प्रवाशांची तुफान गर्दी आहे. त्यामुळे या भारतीयांना विमानतळात जाताच येत नाही.
अफगाणिस्तानमधले सर्व भारतीय तिकडे सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५0 भारतीयांचे अपहरण केलेले नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. मात्र आता एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे निश्‍चित झाले आहे की, अफगाणिस्तानमधले भारतीय सुरक्षित आहेत.
अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेली आणि संपूर्ण जगात मोठी खळबळ माजली. सर्वच देशांनी आपापल्या देशवासीयांना वाचवण्यासाठीची खटपट सुरू केली असून अनेक अफगाण नागरिकांनी मिळेल त्या वाटेने आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचे सत्र सुरू केले. या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच अजून एक गंभीर बातमी समोर येत आली ती म्हणजे साधारण १५0 नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची. मात्र आता या बातमीमागचे सत्यही समोर आले आहे. अफगाणिस्तानमधील भारतीय सुरक्षित आहेत.
काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावरुन तालिबान्यांनी ज्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यातले अनेक जण भारतीय असल्याची माहिती एएनआयने दिली होती. मात्र त्यानंतर लगेचच खुलासा करत एएनआयने अफगाण माध्यमांच्या हवाल्याने सांगितले की, अशा प्रकारचे काहीही झालेले नाही. अफगाणिस्तानमधले सर्व भारतीय तिकडे सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, अहमदुल्लाह वसेक नावाच्या एका तालिबानी प्रवक्त्याने १५0 भारतीयांचे अपहरण केलेले नसल्याचा दावा अफगाण प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. मात्र आता एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हे निश्‍चित झाले आहे की, अफगाणिस्तानमधले भारतीय सुरक्षित आहेत. काही तासांपूर्वीच भारतीय हवाई दलाने काबूलमधून ८५ भारतीयांना बाहेर काढले आहे. हे विमान ताजिकीस्तानमध्ये उतरवण्यात आले आहे. अजून एक विमान बचावकार्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.