Home Breaking News बौद्ध स्थळे सुरक्षित ठेवण्याचे तालिबानचे श्रीलंकेला आश्वासन

बौद्ध स्थळे सुरक्षित ठेवण्याचे तालिबानचे श्रीलंकेला आश्वासन

0
बौद्ध स्थळे सुरक्षित ठेवण्याचे तालिबानचे श्रीलंकेला आश्वासन

बौद्ध स्थळे सुरक्षित ठेवण्याचे तालिबानचे श्रीलंकेला आश्वासन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : काबुल – तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता त्यांच्या कायद्यानुसार तिथे राज्य येईल. मात्र तालिबान अफगाणिस्तानमधील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान करणार नाहीत. त्यांचे योग्य जतन केले जाईल, असे आश्वासन तालिबानने श्रीलंकेला दिले आहे. २००१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानातील सर्वात मोठा बुद्ध पुतळा उध्वस्त केला होता. त्यामुळे जगभरातून त्यांचा निषेध होत होता. म्हणून त्यांनी आता ही भूमिका घेतली आहे.

श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळबरोबर आमचा कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती आहोत. आम्ही आमचा देश अफगाणिस्तानला परदेशी सुरक्षा दलापासून मुक्त करण्यासाठी २० वर्षे लढत आहोत, असे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील सर्व शहरांवर तालिबानने कब्जा केला आहे. मार्च २००१ मध्ये तालिबानने बामियान खोऱ्यातील भगवान गौतम बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती नष्ट केली होती. त्यामुळे जगभरातील देशांमधून तालिबानचा निषेध केला जात होता. श्रीलंका हा त्यापैकी एक आहे. जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांनी याविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आता तालिबानने बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान करणार नाही, अशी खात्री श्रीलंकेला दिली आहे.