मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री चित्रा यांचे निधन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12376*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

224

मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री चित्रा यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : चेन्नई  – मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री चित्रा यांचे निधन झाले. त्या ५६ वर्षांच्या होत्या. शनिवारी २१ ऑगस्ट रोजी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. चेन्नईमधील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

चित्रा यांनी ८०च्या दशकात अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास तीन दशक इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यांनी मल्याळम आणि तमिळ भाषेतील १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या छोट्या पडद्यावरील तमिळ मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. पण २१ ऑगस्ट रोजी आर्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. चित्रा यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मल्याळम आणि तमिळ चित्रपटांशिवाय कन्नड, तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यांनी ‘राजिया’ आणि ‘एक नई पहेली’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. चित्रा यांचा जन्म २१ मे १९६५ साली केरळमधील कोच्ची येथे झाला होता.