Home Breaking News ‘बंदिस्त संसार’, क्षणिक संतापाने उध्वस्त सारे सुख!

‘बंदिस्त संसार’, क्षणिक संतापाने उध्वस्त सारे सुख!

93 views
0

कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर कारागृहातील बंदिस्त रक्षाबंधनाला मुकणार,
यंदाही कुटुंबियांसोबत होणारी भेट रद्द, रोगाने कैद्यांचाही सुखद क्षण हिरावला,
अजय बिवडे, संपादक
विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल
विदर्भ वतन वृत्तपत्र विशेष
माणूस म्हणून देवाने,
उगवले एक रोप,
मात्र एका क्षणिक संतापाने,
संपविले सारे सुख़़़!
आपल्या देशात कारागृहाचे ८ प्रकार आहेत़ केंद्रीय कारागृह, जिल्हा कारागृह, उप कारागृह, महिला कारागृह, खुले कारागृह, बोस्टन कारागृह, विशेष कारागृह व इतर कारागृह़ देशात जिल्हानिहाय कारागृह निर्माण करण्यात आलेले आहे़ अशातच मुख्य शहरांमध्ये केंद्रीय कारागृह विकसीत करण्यात आले़ अशाप्रकारे देशात कारागृहांची संख्या १४०१ आहे़ यातील अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या ही क्षमतेपेक्षा जास्त आहे़
आजवर ४२ लाखांच्यावर कैदी येथे शिक्षा भोगत असून यात पुरूष कैद्यांसह महिला कैद्यांचाही समावेश आहे़ कैद्यांना त्यांच्या शिक्षे व वागणुकीप्रमाणे कारागृहातील रवानगी ठरविली जाते़ दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्या कैद्यांना केंद्रीय कारागृहात तर चांगली वागणूक असलेल्या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवण्यात येते़
चांगल्या वागणुकीमुळे अनेक कैद्यांना शेतीसारखी इतर कामे खुल्या कारागृह परिसरात करण्याची मुभा असते़ तसेच प्रत्येक कारागृहात कैद्यांच्या विरंगुळेसाठी, छंद जोपासण्यासाठी किंवा शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लघु उद्योगाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे अथवा शिक्षण पुर्ण करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे़ बंदिस्तांच्या समुपदेशनासाठी आज अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे़ कैद्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार होणार नाही याची खबरदारीसुध्दा कारागृह व्यवस्थापनाच्यावतीने तसेच सामाजिक संस्थेच्यावतीने घेण्यात येते़ प्रत्येक कैद्याने कारागृहातून शिक्षा पुर्ण केल्यानंतर समाजात वावरतांना गुन्हेगारीचा मार्ग सोडावा हाच मुळ उद्देश डोळ्यापुढे असतो़ दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीयांमुळे समाजात दहशत निर्माण झालेली आहे, मात्र कारागृहात अट्टल गुन्हेगारच शिक्षा भोगत आहे असेही नाही़
काही परिस्थितीच्या अभावामुळे तर काही क्षणिक संतापाच्या भरात केलेल्या चुकीमुळे आज कारागृहात कैद आहेत़ दरवर्षी रक्षाबंधनानिमीत्त त्यांची कुटुंबियांसोबत भेट होत असते़ कुटुंबातील सदस्यांना भेटुन त्यांच्या चेहºयावरील समाधान जगावेगळेच चित्र सांगून जाते़ मात्र कोरोना रोगामुुळे मागील वर्षी या भेटी शक्य झाल्या नाही तर, यंदाही होणार नाही़ कारागृहात बंदिस्त असलेल्या भावांची बहिण व कुटुंबियांसोबत रक्षाबंधनाला होणाºया भेटीमुळे कारागृह परिसर अक्षरक्ष: गहिवरतो़ तेथे उपस्थित कारागृह कर्मचाºयांनाही अश्रु अनावर होतात़ मात्र क्षणिक संतापाच्या भरात घडलेल्या गुन्ह्याची हीच काय शिक्षा? हाच एक प्रश्न प्रत्येक बंदिस्ताच्या आसुरलेल्या डोळ्यात दिसून येते़ या भेटीवेळी येणाºया कुटुंबातील चिमुकल्यांच्या निरागस चेहºयावर आम्हाला का ही शिक्षा? असाच प्रश्न असतो़
कुटुंबियांसोबतच्या भेटीमुळे बंदिस्तांचे झालेले समाधान कारागृहातील काळे दिवस विसरण्यात मदत करीत असतील कदाचीत़ यंदा या भेटी होणार नाही म्हटल्यावर त्यांचेही डोळे कुटुंबियांना बघण्यासाठी आसुरलेले असणारच़ कोरोना रोगाने सर्वसामान्यांचे सारे काही हिरावले असतांनाच हा क्षण अतिशय दु:खदच म्हणावा लागेल़ प्रशासनाच्या मनात असुनही कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर निर्माण झालेल्या संकटामुळे रक्षाबंधनाचा कार्यक्रम रद्द झालेला आहे़
त्राही झाले संसाराविना,
खंत कुणाला सांगावी,
एक हाक भिंतीआड,
हिच बंदिस्ताची कहाणी़़़

नागपूर, मोक़्र – ८६९८७८८६६६