स्वातंत्र्यदिनी वाडीत शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन

134

विदर्भ वतन प्रतिनिधी, वाडी: परीसरातील वार्ड क्र १७ मधील शिवशक्तीनगरच्या संत गजानन महाराज मंदिर प्रांगणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे यांचे हस्ते शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. ढोल ताश्याच्या निनादात “जय भवानी जय शिवाजी” च्या गजरात जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे यांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम गजानन महाराज मंदिरात पुजा अर्चना करण्यात आली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन शाखेच्या फलकाचे विधीवत उद्घाटन राजेन्द्र हरणे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना शहर प्रमुख प्रा. मधु माणके-पाटिल यांनी या शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे व तालुका प्रमुख संजय अनासाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर जिल्हाप्रमुख राजेन्द्र हरणे,विधानसभा सह संपर्क प्रमुख दिवाकर पाटणे,विधानसभा संघटक संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनासाने,उपतालुका प्रमुख रुपेश झाडे,वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊराव रेवतकर,उपाध्यक्ष राकेशजी अग्रवाल, शिव व्यापारी सेनेचे नंदु सोमकुवर, टायगरग्रुपचे रवि अजित प्रामुख्याने उपस्थित होते. नवनियुक्त वार्ड प्रमुख गौरव ऊगले, शिवम राजे,शाखाप्रमुख विनय वडे,उप शाखाप्रमुख साहिल सहारे व शाखा सदस्य अक्षय पाटणे,अभिषेक पांडे,संकेत पारधी,यश भेंडारे,तन्मय आसोले ,लाँरेन्स गुलदेवकर,गौरव आहाके यांचे भगवा दुपट्टा व गुलाबपुष्प देवुन जिल्हाप्रमुख राजेंन्द्र हरणे यांनी अभिनंदन केले व शाखेला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजु पाल, अँड अरुण तैले, दिनेश तिवारी, उपविभागप्रमुख गुलशन शेंडे,सुनिल बनकोटी,श्यामलाल सकलानी, प्रमोद जाधव,चंदन दत्ता,सौरव घडीनकर,राघोजी नागलवाडे,भोजराज भोंगळे,संजीव बोराडकर,अजय देशमुख, महेश पिंगळे,उमेश महाजन,आकाश बोंदेले शिवसेना पदाधिकारी व परीसरातील रहिवासी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपेश झाडे तर संचालन आयोजक मधु माणके-पाटिल यांनी केले.