तळागाळातील संघर्ष करणा-या महिलांना भेटून त्यांच्यावर साहित्य लिहा : उषाकिरण आत्राम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12346*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

224

तळागाळातील संघर्ष करणा-या महिलांना भेटून त्यांच्यावर साहित्य लिहा : उषाकिरण आत्राम

विदर्भ वतन,गोंदिया-तळागाळातील संघर्ष करणा-या महिलांना भेटून त्यांच्या संघर्षाच्या कथा, कविता, लेख, ललित साहित्य लिहा. दबलेल्या, दुर्लक्षित हजारो महिलांच्या कथा, गाथा, आत्मकथा जन्मास येथील. साहित्यात नव्या जिवंत, अस्सल साहित्याची भर पडेल, असे गोंडवाना दर्शनच्या रचनाकार विद्यापीठीय जेष्ठ साहित्यिक उषाकिरण आत्राम यांनी महिलांना लिहिण्यासाठी नवीन दिशा देताना मार्गदर्शन करताना सांगितले. आम्ही विश्व लेखिका व संविधान मैत्री संघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एस.एस.ए. गर्ल्स म्युनिसिपल शाळेत साहित्य लेखन प्रोत्साहन, सांस्कृतिक बौद्धीक जागृती उपक्रम कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी आदिवासी संस्कृतीबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की, आदिवासी संस्कृती ही विश्वातील अतिप्राचीन मातृपूजक आदर्श संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत आली बेटी झाली बेटी, धनाची सापडली पेटी असे गीत गावून स्वागत करतात. तिला अंगणातली सुगंधी वेल, गोड पाण्याचा झरा, सोन्याची मोहरं अशा सुंदर उपमा दिल्या जातात. मुलीला दुय्यम समजल्या जात नाही. स्वमजीर्ने जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. विधवेला दुसरं लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे. सोडचिठ्ठी घेता येते. नव-याच्या नावाचे कुंकू, बांगड्या, जोडवे, मंगळसूत्र इत्यादि सौभाग्य अलंकार नाहीत. सौभाग्यवती हा शब्द गोंडी डिक्शनरीमध्ये नाही, असे सांगून त्यांनी शब्दांची माहिती दिली. याप्रसंगी अध्यक्ष प्रा.डॉ. दिशा माणिकराव गेडाम, उपाध्यक्ष डॉ. सुवर्णा हुबेकर, सचिव प्रा.डॉ. कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक सदस्य पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले, संविधान मैत्री संघ व महिला सशक्तीकरण संघातर्फे माधुरी पाटील, मुख्याध्यापिका उमा गजभिये, गौतमा चिचखेडे, समता सैनिक दलातर्फे कमांडर किरण वासनिक, जिजाऊ ब्रिगेडच्या सविता बेदरकर, एस.एस.ए. गर्ल्स मुनिसिपल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता एच. जोशी आदी उपस्थित होत्या. या जागृती उपक्रमाअंतर्गत महिला व विद्यार्थ्यांसाठी निबंध, काव्य सुमनांजली, वक्तृत्व कला, गोंडी नृत्य इत्यादी सांस्कृतिक-बौद्धीक स्पर्धा घेण्यात आल्या. संचालन कावळे यांनी केले. आभार शालू कृपाले यांनी मानले.