कार अपघातात तिघे ठार, दोघे जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12341*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

213

कार अपघातात तिघे ठार, दोघे जखमी

विदर्भ वतन,पुसद-येथील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत खंडाळा घाटात तवेरा गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर आहेत. अशोक केंद्रे (वय ४५) रा. आंबासे, जि. हरदा (म.प्र.), अनंत पाटील (वय ४५) रा. कालकोंड जि. खंडवा (म.प्र.) व अरविंद बाके (वय २५) रा. निसानिया, जि. खंडवा (म.प्र.) अशी मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमींमध्ये रामशंकर निर्भयदेव खोर (वय ३५) रा. कालकोंडा, जि. हरदा (म.प्र.) व सिंग राजपूत (वय ६५) रा.अवलिया जि.खंडवा (म.प्र.) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील वाशीममार्गे पुसद येथे मुलगी बघण्यासाठी येत असलेली तवेरा क्र. एमपी 0९, बीसी९५८९ गाडी खंडाळा घाटात आली असताना अचानक चालकाच्या पायाखाली बिसलेरी बॉटल आल्याने ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मेन रस्त्यापासून ही गाडी जवळपास ७0 ते ८0 फूट दूर जाऊन सागवान वृक्षावर आदळली. या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले असून, दोघे जण गंभीर आहेत. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते शिलानंद कांबळे पोहोचून त्यांनी तत्काळ १0८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून काही जखमींना खासगी गाडीत तत्काळ रुग्णालयात हलविले. या घटनेचा तपास ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.