Home Breaking News गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली; टीका होताच युवासेनेचे मेळावे रद्द

गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली; टीका होताच युवासेनेचे मेळावे रद्द

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12336*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

63 views
0

गर्दीमुळे कोरोना नियमांची पायमल्ली; टीका होताच युवासेनेचे मेळावे रद्द

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :मुंबई  – आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन युवासेनेतर्फे राज्यभर पदाधिकारी संवाद दौरे केले जात आहे. सध्या कोरोनाचे सावट असूनदेखील या कार्यक्रमांत मोठी गर्दी होत आहे. हे लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमांत गर्दी होऊ नये म्हणून युवासेनेचे मेळावे रद्द करण्यास सांगितले आहे. यानंतर आता फक्त युवासेनेच्या प्रमुख पदाधिकऱ्यांसोबत बैठक होनार असल्याची माहिती युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी दिली. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे निर्देश तसेच सध्याची कोरोनास्थिती याबाबत सरदेसाई यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये म्हणून युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील सर्व मेळावे रद्द करण्यात येत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील युवासेनेचे सर्व मेळावे रद्द करण्यात आले असून फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे,” असे सरदेसाई यांनी सांगितले.

औरंगाबादेत सरदेसाई यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी वरुण सरदेसाई यांच्या स्वागतासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच येथे कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला होता. तशीच परिस्थीती नाशिकमध्ये निर्माण झाली. त्यानंतर आता युवासेनेच्या संवाद मेळाव्यात होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे होत असलेले उल्लंघन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्यातील युवासेनेचे मेळावे रद्द करण्यात आले आहेत. येथे फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.