कोरोना लसीकरणानंतर १६ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक; सरकार देणार १.५ कोटी रुपये

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12331*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

174

कोरोना लसीकरणानंतर १६ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक; सरकार देणार १.५ कोटी रुपये

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : सिंगापूर – कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. सध्या उपलब्ध असणारी कोणतीही लस ही रामबाण उपाय नसून, लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते, असे सगळ्याच लस उत्पादक कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. सिंगापूरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका १६ वर्षांच्या मुलाला चक्क हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली असल्याचे समजते.

दरम्यान, सिंगापूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या १६ वर्षीय मुलाने फायझर लसीचा डोस घेतला होता. हा डोस घेतल्यानंतर सहा दिवसांमध्येच त्याला हार्ट अटॅक आला. लस घेतल्यानंतर हा धक्का बसल्यामुळे या मुलाने सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली. सरकारने परिस्थितीची माहिती करुन घेत, त्याला २ लाख २५ हजार डॉलर्स देण्याची घोषणा केली. म्हणजेच, लसीच्या या साईड इफेक्टमुळे या मुलाला आता सुमारे दीड कोटी रुपये मिळणार आहेत. सिंगापूर व्हॅक्सिन इंज्युरी फायनॅन्शिअल असिस्टंट प्रोग्राम या योजनेअंतर्गत त्याला ही रक्कम मिळणार आहे.

वैद्यकीय तपासणीमध्ये असे दिसून आले, की मायोकार्डिटिसच्या समस्येमुळे या मुलाला हृदयविकाराचा झटका आला होता. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची शक्यता मेडिकल रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कॅफेनचे अतिसेवन, आणि अवजड वस्तू उचलल्यामुळेही हृदयावर ताण आला असेल,असे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सध्या हा मुलगा रुग्णालयात असून, त्याची तब्येत सुधारत असल्याचे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.तसेच सिंगापूरमध्ये मात्र एक लाखांमध्ये केवळ ४८लोकांना ही समस्या दिसून येत आहे.

फार्माकोविजिलेन्स मॉनिटरिंगच्या आधारे प्राप्त झालेल्या डेटानुसार ही माहिती देण्यात आली आहे. हे टाळण्यासाठी लसीकरण झाल्यानंतर कमीत कमी एक आठवडा आराम केला पाहिजे. या दरम्यान जिम, किंवा कोणतीही स्पोर्ट्स अक्टिव्हिटी करणं टाळावे. असे आवाहन अथॉरिटीने केलेआहे.