पाकिस्तानात मोहरम मिरवणुकीत स्फोट; दोन ठार, २५ जखमी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12327*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

148

पाकिस्तानात मोहरम मिरवणुकीत स्फोट; दोन ठार, २५ जखमी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गुरुवारी मोहरम मिरवणुकीला लक्ष्य केलेल्या शक्तिशाली स्फोटात सात वर्षांच्या मुलीसह दोन जण ठार झाले आणि २५ जखमी झाले. येथील वरिष्ठ पोलिसांनी ही माहिती दिली. लाहोरपासून २६० किमी अंतरावर असलेल्या पूर्व पंजाब प्रांतातील बहावनगर शहरात हा स्फोट झाला. शिया समुदायाची ही धार्मिक मिरवणूक इमामबाऱ्याच्या दिशेने जात असताना हा स्फोट झाला.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळाकडे जाताना दिसत आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कडक सुरक्षा असूनही, मोहरम मिरवणुकीत ग्रेनेड फेकला गेला. ते म्हणाले, “सात वर्षांची मुलगी माहीन आणि २० वर्षीय सलमानसह दोन व्यक्ती ठार झाल्या, तर २५ हून अधिक जखमी झाले.” १० वाजता ही धार्मिक मिरवणूक जामिया मशीद मोहजीर कॉलनीतून जात होती.पोलिसांनी संशयिताला घटनास्थळीच अटक केली.मुलतान पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आशुरा मिरवणुकीत ग्रेनेड फेकणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना बहावलनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कराची, हैदराबाद, क्वेटा आणि सुकूरसह पाकिस्तानच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये मोबाईल सेवा बंद करण्यात आली आहे.