
– डॉ. पल्लवी स. थोटे
एम.डी. (संहिता सिद्धांत)
एम.ए. (संस्कृत स्कॉलर)
मोक़्र- 9637976004
कांती युक्त त्वचा नसने, त्वचेवर काळे डाग (वांग) निर्माण होणे, चेह-यावर पुटकळ्या निघणे, चेह-याची त्वचा अति स्निग्ध (तेलकट) असणे आदि अनेक समस्या सामान्यत: आढळून येतात. आयुर्वेद वनस्पती असलेल्या अनेक फेसक्रिम, फेसपॅक आपण बघतो. परंतु आयुर्वेद शास्त्र सौंदर्याची व्याख्या कशी करतो आज आपण हे बघणार आहोत. थोडक्यात आयुर्वेदात वर्णित सौंदर्य टिकविण्यासाठी व सदैव सौंदर्यवान असण्यासाठी उपलब्ध उपचार पद्धती विषयक माहिती आपण बघणार आहोत.
त्वचा सुंदर असण्यासाठी आपला आहार कुठल्या प्रकारचा आहे. याची माहिती असणे अत्यावश्यक असते. यासाठी संबंधित वैद्याकडून माहिती घ्यावी. तुमचा आहार व त्वचा विकृती यांचा जवळचा संबंध आहे.
आयुर्वेदात केल्या जाणा-या ऋतुनुसार पंचकर्म उपचार पद्धतीचा (बस्ती, वमन, विरेचन, नस्य, रक्त मोक्षण आदी) चा उपयोग हा त्वचा सतेज करण्यासाठी होतो. पंचकर्म पद्धतीनुसार शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे त्वचेचा वर्ण सुधारणा-या वनस्पतीचा वापर होतो. उदा. हरिद्रा, लोध्र, सारिवा, मंजिष्ठा आदि परंतु कुठल्या व्यक्तीला रक्ष असलेल्या वनस्पतीचा लेप उपयोगात येईल. याचे नियोजन करणे गरजेचे असते.
उपयोगी माहिती:
१. त्वचा सौंदर्यासाठी रात्री उशीरा झोपणे व उशीरा उठणे आदि टाळावे,
२. अति उष्ण मसालेदार पदार्थ टाळावे,
३. मद्यपान टाळावे,
४.मोबाइल, लॅपटाप आदीचा वापर आवश्यकतेनुसार करावा,
५. एकाचवेळी थंड पेये व उष्ण पदार्थ किंवा पेये घेऊ नये.
६. चेह-यावरील वर्णहीनता ही तुमच्या शरीरातील घटकातील असंतुलित निर्मितीकारक असते त्यामुळे योग्य तो उपचार करून घ्यावा.
उदा. सततच्या होणाºया अपचनातून चेहºयावर मुरुंब(पिंपल) निर्माण होतात. त्यामुळे योग्य ते उपचार (जळू लागणे) आदि करून घ्यावे.
अन्नपदार्थ व गैरसमज
दही थंड आहे- सामान्यत: दही थंड असते म्हणून लोकं मुखपाक (तोंडाला फोड येणे) किंवा शरीराचा दाह होणे अशा उष्णताजन्य आजारात आहारात सेवन करतात. परंतु दही स्वभवत: उष्ण गुणधर्माचे आहे. त्यामुळे त्वचारोग, ताप येणे, नागीन, नाकातून रक्त निघणे आदि विकारात घेऊ नये.

