विदर्भ वतन, नागपूर – मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस आॅफ महाराष्ट्र किताब २०२१ सीझन ५ च्या अंतिम फेरीत नागपूरच्या सौंदर्यवती रूचा खोब्रागडे सिल्वर गटात प्रथम क्रमांकाच्या उपविजेत्या ठरल्या आहेत. दिवा पैजेंट्सतर्फे पुणे येथे मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस आॅफ महाराष्ट्र २०२१ सीझन ५ च्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले.
रूचा खोब्रागडे यांना “मिसेस डिवाईन दिवा” किताबही प्राप्त झाला आहे. दिवा पैजनट्सचे निर्माता कार्ल आणि अंजना मासकॅरेन्हास यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूडचे दिग्गज कलाकार शक्ती कपूर हे उपस्थित होते. अभिनेत्री कश्मिरा शाह, पुला फाऊंडर सोनाली अगरवाल कोंजेती, विनय अरान्हा हे परीक्षक लाभले. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाºया ५६ विवाहित सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत २० ते ३६ वर्षे वयोगटासाठी सिल्व्हर आणि ३७ व त्यावरील वयोगटासाठी गोल्ड असे दोन गट करण्यात आले होते.
रूचा खोब्रागडे या सिल्वर गटातील स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक गटातून अंतिम फेरीसाठी सर्वोत्तम स्पर्धक निवडण्यात आले होते. त्यात रूचा खोब्रागडे यांचा समावेश होता. रूचा खोब्रागडे यांनी नागपूर युनीवरसीटी मधून बी.ई. केले आहे व त्या पुण्याच्या एम. एन. सी. इन्फोसिस लिमिटेड मधे इम्प्लोइ आहेत.

You missed