सुनीलकुमार मांडवे यांना आंतरराष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार जाहिर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12309*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

राष्ट्रीय उद्योग इंडिया संघटनेचे महामंत्री सुनीलकुमार यादवराव मांडवे यांना आंतरराष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार जाहिर
-शिवराज एग्रो डोमेस्टीक एअरलाइन्सच्या व्हाइस सीएमडी प्रतिभा कुमरे यांना नेपाल-भारत मैत्री आंतरराष्ट्रीय पुरस्कार

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,दिल्ली: भारत नेपाळ दलित मैत्री आंतरराष्ट्रीय संघ व बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीचा पाहिला आंतरराष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार औद्योगिक क्षेत्रात अद्वितीय कार्य करणारे राष्ट्रीय उद्योग इंडिया संघटनेचे महामंत्री सुनीलकुमार यादवराव मांडवे यांना जाहीर करण्यात आला आहे.

बाबु जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.


देश विदेशातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, औद्योगिक क्षेत्रातील असामान्य व्यक्तीगत संस्था, सेवा कर्मींचा लुंम्बिनी नेपाळ येथे आपला 8 मे 2021 रोजी होणा-या 9व्या आंतरराष्ट्रीय भारत नेपाळ दलित मैत्री आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार मांडवे यांना प्रदान केला जाणार असल्याचे मत बाबू जगजीवन राम कला संस्कृती आणि साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. गोरख साठे यांनी सुनीलकुमार यादवराव मांडवे यांना पुरस्कार निवडीची पत्र दिले आहे. सुनीलकुमार मांडवे हे विदर्भ सोया मिल्क प्रा. लि., विदर्भ बायोआरगॅनिक फर्टिलायझर लि,शिवस्वराज्य अग्रो डोमेस्टिक एअरलाईन प्रा.लि.या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सीएमडी, राष्ट्रीय उद्योग इंडिया संघटनेचे महामंत्री म्हणून काम पहात आहेत. सुनीलकुमार मांडवे व प्रतिभा कुमरे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने देश विदेशातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.