उपमहापौरांच्या निधी वाटपात गैरव्यवहार,विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा आरोप

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12304*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

107

उपमहापौरांच्या निधी वाटपात गैरव्यवहार,विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा आरोप

विदर्भ वतन,नागपूर-महापालिकेत दुर्बल घटकांच्या निधी वाटपातील गैरप्रकार गाजत असतानाच विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी उपमहापौरांच्या निधी वाटपात गैरव्यवहाराचा आरोप केल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली आहे. उपमहापौरांच्या निधीतून र्मजीतील कंत्राटदारांच्या कामांना मंजुरी दिली जात असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. ही कामे तत्काळ थांबविण्यात यावी, सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सांगितले आहे. यासंदभार्तील तक्रार वनवे यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली आहे.
आगामी सहा ते सात महिन्यात नागपूर महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे, सत्ताधा-यांमध्ये कामे दाखविण्याची हुरहुर लागली असून प्रभागातील रस्ते याशिवाय अन्य कामांचा सपाटा लावण्यात येत आहे. परंतु, या कामांना मंजुरी देत असताना ही कामे उपमहापौर मनीषा धावडे यांनी दोन कोटींच्या निधीचे नगरसेवकांना वाटप करताना मर्जीतील कंत्राटदारांच्या माध्यमातून दिल्याचा आरोप वनवे यांचा आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने तीन लाखांपर्यंतच्या कामाचा समावेश आहे. या सर्व कामांमध्ये मोठया प्रमाणात अनियमितता झाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वनवे यांनी केली आहे. या संदर्भातील एक पत्र वनवे यांनी मनपा अयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले आहे. प्रशासनाने चौकशी न केल्यास या संदर्भात न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सर्व नगरसेवकांचे समाधान शक्य नाही
निधी वाटपात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचीही एक फाईल मंजूर केली. दोन कोटींच्या निधीतून सर्व नगरसेवकांचे समाधान शक्य नाही. वनवे यांनी केलेल्या मागणीनुसार निधी वाटपाची मनपा आयुक्तांनी चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया उपमहापौर मनीषा धावडे यांनी दिली.