Home Breaking News अल्पवयीन प्रेमात अश्लील चाळे नको पुन्हा पुन्हा अखेर पोलिसात होऊ शकतो दाखल...

अल्पवयीन प्रेमात अश्लील चाळे नको पुन्हा पुन्हा अखेर पोलिसात होऊ शकतो दाखल गुन्हा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12298*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

79 views
0

अल्पवयीन प्रेमात अश्लील चाळे नको पुन्हा पुन्हा
अखेर पोलिसात होऊ शकतो दाखल गुन्हा

विदर्भ वतन,नागपूर : प्रेमात आंधळ्या झालेल्या १५ वर्षीय मुलीने तिच्या १९ वर्षीय प्रियकरासोबत आधी मंदिरात जाऊन लग्न केले. मग त्याने ‘ब्रेकअप ‘ केले म्हणून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करून अत्याचाराचा आरोप लावला. मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी मुलावर पोक्सो अँक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीत १५ वर्षीय मुलगी आणि १९ वर्षीय आरोपी क्रिष्णा राजेश शर्मा हे शेजारी शेजारी राहतात. मुलगी सीताबर्डी येथील एका शाळेत शिकायची. कोरोनामुळे शाळा बंद होण्याआधी ती बसने शाळेत जायची. दोघेही शेजारीच असल्याने दोघात चांगलीच ओळख होती. क्रिष्णाला मुलगी आवडत असल्याने त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकणे सुरू केले. ती शाळेतून येत जात असताना तो तिची वाट पाहत थांबला असायचा. हळूहळू मुलीनेही त्याला प्रतिसाद देणे सुरू केले. क्रिष्णाने मुलीला लग्नाची गळ घातली.१३ आॅगस्ट २0२१ ला क्रिष्णा तिला राय टाऊन हिंगणा रोड येथील एका मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्या गळ्यात हार आणि मंगळसूत्र टाकले. तर मुलीनेही त्याच्या गळ्यात हार टाकून नवरा म्हणून त्याचा स्वीकार केला. पुढे पुन्हा त्यांनी त्यांचे चाळे सुरूच ठेवले. पण त्यानंतर तो तिला सारखा सारखा शरीरसंबंधांसाठी तगादा लावू लागला होता. तिला वारंवार घरच्यांना काहीतरी सांगून बाहेर पडणे शक्य होत नसल्याने तिने त्याला नकार देणे सुरू केले. त्यामुळे १६ आॅगस्टला दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास त्याने तिला मैदानात नेहमीच्या ठिकाणी बोलविले. तेथे त्यांच्यात भांडण झाले आणि त्याने रागाच्या भरात तिच्याशी ‘ब्रेकअप’ घेतला आणि तिला मारहाणही केली. त्याच्या अशा वागण्यामुळे मुलगी चांगलीच व्यथित झाली. तिने सरळ एमआयडीसी पोलिस ठाणे गाठत तेथे क्रिष्णाविरुध्द अत्याचाराची तक्रार नोंदविली. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द पोक्सो अँक्ट अन्वये अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.