विजया मारोतकर लिखित “वजह” हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12293*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

372

विजया मारोतकर लिखित “वजह” हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन

विदर्भ वतन,नागपूर : “आज समाज अनेक विपदांमधून मार्गक्रमण करीत असताना तळागाळातील शेवटच्या माणसाच्या प्रश्नांना जाणून घेत,त्यावर उपाय सुचविणारी तसेच सर्वसामान्यांना आपलीशी वाटणारी सुबोध, सरल हिंदी कविता घेऊन मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक,कवयित्री विजया मारोतकर ‘वजह’ हा काव्यसंग्रह घेऊन हिंदीच्या काव्य प्रांतात पदार्पण करीत आहेत. मी त्यांचे मन:पूर्वक स्वागत करतो. संग्रहनीय आणि नितांत वाचनीय असा हा,काव्यसंग्रह हातोहात विकल्या जाईल अशी ग्वाही देतो “असे उद्गार हिंदीचे प्रख्यात कवी श्री.अनिल मालोकर यांनी विजया मारोतकर लिखित ‘वजह’ या काव्यसंग्रहाच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी काढले.
यावेळी मंचावर उद्घाटक डॉ.प्रियंका सोनी, जळगाव तसेच विशेष अतिथी डॉ.रत्ना चौधरी नगरे,वर्धा ह्या उपस्थित होत्या.
अध्यक्ष मालोकर पुढे म्हणाले की..या मनभावन कविता आध्यात्म सांगून विलक्षण शब्दकळा जपतात…
रहने दो.. कवितेच्या या ओळी….
मै तो एक सरिता हूँ
मुझे मेरी लगन मे बहने दो…
असे निक्षून सांगताना अपेक्षा भंगाला
सहज स्वीकारत म्हणते…की
अनकही सी बाते कुछ कुछ
अब अनसुनी ही रहने दो..
राधा तो मै बन न सकी
मुझे मीरा ही रहने दो…..
अन्य काही कवितांचा ही त्यांनी सुरेख उल्लेख केला.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूरच्या वतीने कवयित्री विजया मारोतकर यांच्या ‘वजह’ या हिंदी काव्यसंग्रहाचा आॅनलाइन प्रकाशन सोहळा संपन्न झाला. उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या जळगाव येथील सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रियंका सोनी ‘प्रीत’ या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या की – “काळजाला हात घालणारी ‘वजह’ मधिल प्रत्येक कविता श्वासा सारखी भासते. कवयित्रीचे हिंदीमध्ये भविष्य उज्ज्वल आहे, हे सिद्ध करते . प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही आशादायी कविता आहे. काही आवडलेल्या कवितांचा ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला…’कैफियत’ कविता प्रत्येकाचीच व्यथा जणू…. त्या म्हणतात…
‘इन्सानियत कितनी संभाले
उनके वार सहते सहते …
अपनो ने जब दिये जखम
किसे सुनायें रोते-रोते …..’
पण ..कधी अचानक काही मोहक क्षण
पुढ्यात दाखल होतात. त्या वेळी जिंदगी कविता लिहितांना म्हणतात…
“तरस खा के मुझपर
कभी मेहरबाँ हो जाती है जिंदगी
ना माँगते हुए भी
हसीन पल दे जाती है जिन्दगी…”
अशा वाचनिय या कविता आहेत..
हिंदी काव्य प्रांतात सुद्धा विजया मारोतकर आपली ठळक नाममुद्रा उमटवतील व यशस्वी ठरतील याची मला खात्री वाटते. वाचकांना हा काव्यसंग्रह प्रचंड आवडणार आहे, हातोहात विकल्या जाईलच ही खात्री वाटते,याप्रसंगी मी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देते.
काव्यसंग्रहाची प्रस्तावना ज्यांनी लिहिलेली आहे.त्या डॉ. रत्ना नगरे चौधरी या लोकार्पण प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, ‘जीवनात आलेल्या विविध अनुभवां मधून आलेल्या संवेदनशील भावनां सोबतच समाजातील संवेदनशील विषयांचे निरीक्षण, अवलोकन,
समस्या तसेच त्यावरील उपाय सुचवत निराशेतून आशेकडे नेणारी ह्या अतिशय वाचनीय अशा कविता आहेत. विजयाताई हिंदी मध्ये ही उत्तम लिहितात याची साक्ष ‘वजह ‘ मध्ये दिसते.विजयाताईंची
हिंदी प्रांतात ओळख निर्माण करण्याची वजह हा ‘वजह’ सिद्ध होईल, यात जराही शंका वाटत नाही.
‘अंधेरो में बैठकर
उजाले ताकते रहे
रोशनी की इक इक
किरण को तरसते रहे’ ..तरसते रहे कवितेतून योग्यता असतांनाही हवे ते न गवसण्याची व्यथा तर व्यक्त होतेच,त्याच वेळी ..आशावाद व्यक्त करतांना सांगते की..
“इतिहास के पन्नोमे एक दिन
सिमटकर रह जाना है
आज भलेही हो गम
कल तो खुशियों को आना ही है..”
असा वाचकांच्या मनाला समतोल साधणारी ही कविता आहे.
मराठी तसेच हिंदीतील वाचक या काव्यसंग्रहाला हातोहात उचलून घेतील याची मला खात्री नव्हे तर विश्वास वाटतो.
कवयित्री विजया मारोतकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या -‘की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे.फार पूर्वी पासून मी हिंदी कविता लिहत आलेली आहे,पण त्या डायरी पुरत्या सिमित होत्या.
जीवनानुभवा सह सभोवताल न्याहाळत, समाजातील प्रश्न मांडत,माणसातील हरवलेल्या माणुसकीचे विदारक चित्र पहात, नात्यांच्या पडझडीला जाब विचारत,मुखवट्यांच्या दुनियेत हरवलले चेहरे शोधणा-या प्रश्नांनी व्यथित काव्य ‘वजह’ चे अंतरंग साकारत जाऊन एक दिवस असा हिंदी काव्यसंग्रह हाती येईल असे कधी वाटले नव्हते.पण आज ते वास्तव आहे. जे पाहून मी ही अचंबीत आहे.माझी कविता ही कुणालाही सल्ला देणारी नसावी तर आनंद देणारी असावी असे मला कायम वाटते. शेवटी या जगातून गेल्या नंतर फक्त नावच शिल्लक राहत, ‘ त्या करीता त्या म्हणाल्या की….
काम ऐसे ही करते रहो…
दुनिया मे नाम रह जाये..
शमाये बुझ जाये लेकीन
तालिया बजती रह जायें…
या सर्व कविता सर्वत्र विखुरलेल्या होत्या.त्यांना एकत्र करुन त्या वजह चे
कारण बनल्या.आज माझं एक स्वप्न पूर्ण झालं.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल देवतळे यांनी केले.सतत कार्यरत असलेल्या आमच्या संस्थेचा हा 26 वा कार्यक्रम आहे. माय मराठी नक्षत्र संस्थेने कोरोनाच्या लॉकडाऊन काळातही हे सातत्य जपले आहे.आजवर अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले असून संस्थेचा नावलौकिक वाढविलेला आहे. असे मत व्यक्त केले.
एकूण सत्तर कवितांचा समावेश असलेला ‘वजह’ हा अंतरबाह्य देखणा असा हा काव्यसंग्रह नाथे पब्लिकेशन, नागपुर यांनी आकारास आणलेला आहे. याची सर्वच मान्यवरांन्नी दखल घेतली. संस्थेच्या सदस्या सुप्रसिद्ध गायिका व निवेदिका शीला बिडकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन वैशाली गोमकाळे यांनी केले तर आॅनलाईन कार्यक्रमाची संपूर्ण तांत्रिक बाजू उज्वला इंगळे,कारंजा लाड यांनी उत्तम रित्या सांभाळली. अतिशय देखण्या संपन्न झालेल्या कार्यक्रम ची सर्वत्र चर्चा आहे.